लाल पराठे

  • १ बीट, १ मुळा, ४ वाट्या कणिक , १/४ प्रत्येकी डाळीच पीठ व तांदळाची
  • पीठी, १ चमचा प्रत्येकी तीळ व ओवा, थोडीशी हळद, १/२ वाटी दही,
  • चवीनुसार मीठ व तिखट, २ चमचे तेल मोहनासाठी व पराठयाला वरून लावण्यासाठी आपल्या आवडीनुसार
४५ मिनिटे
४ जणांकरिता

मुळा व बीट किसून घ्यावे.  एका पातेल्यात दोन्ही  किस एकत्र २-३ मिनिटं वाफवून घ्यावे.एका परातीत वरील सर्व जिन्नस एकत्र करून घट्ट कणिक भिजवून घ्यावी. १० मिनिटे कणिक मुरल्यावर नेहमी प्रमाणे पराठे करावे.

मुलं बीट मुळा खात नाही पण अश्याप्रकारे केलेले लाल पराठे आवडीने खातात.

स्वप्रयोग