फेब्रुवारी २७ २००७

खूप सोसले आयुष्याचे बंधन मी (गजल)

खूप सोसले आयुष्याचे बंधन मी
थांबवतो आता हृदयाचे स्पंदन मी...

सभ्य चेहरा दिसतो माझा वरवर हा
आत खरोखर आहे का पण सज्जन मी?...

चित्त ठिकाणी नसते माझे कधी कधी
बोलुन जातो कुणास काही पटकन मी...

ठरवत गेलो, उलटे घडले अनेकदा
बदलू शकलो नाही माझे प्राक्तन मी...

पाणावू तू नकोस डोळे 'अजब' अता
आवरले आहे बघ हे माझे मन मी...

Post to Feed

छान/सूचना
खूप सोसले - मक्ता
छंद
वा..
छान!!
लयी भारी.
वा!
जिलबीच आहे पण
आत खरोखर आहे का पण सज्जन मी?

Typing help hide