दाद

कोणत्या नभाशी आता
दाद मागावी ना कळे
रानी वैशाख वणवा
काया कोवळीशी पोळे

धग दाहक, जाळते
अन्याय - आटले मन
ज्वाळा उफाळती पुन्हा
कसे करावे शमन

कसे धरावे जिवाला
कुणी कसा द्यावा धीर
वारा आग वाढवतो
काळे पडते शरीर

थेंब एक नाही आला
अजूनही त्याच्या डोळा
थंड रक्ताने करीतो
तोच माझा चोळामोळा

--संपदा