ऋतू येत होते ऋतू जात होते- ५

ऋतू येत होते ऋतू जात होते
जुने ते नव्याने नवे होत होते

जुना तोच साकी जुनी ती सुराही
नव्याने पिणारे हजारात होते

कधी ऐकलेना बरसले कुठेही
जरी मेघ येथील प्रख्यात होते

सदा ती तिची ओढणी आड येते
कधी ना तिच्याशी खुली बात होते

पसारा इथे मी किती मांडला हा
जरी जायचे एक दिन ज्ञात होते

न होकार आला कुणाचा कधीही
कमी एवढे काय माझ्यात होते?

(जयन्ता५२)