मार्च
९
२००७
आनंदाने१
हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने
डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने
जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने
पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने
घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने
मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने
सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने
दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून२ जावे आनंदाने
जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने
— चित्तरंजन
१."आनंदाने" हा शब्द, लागू होऊ शकेल तिथे, क्रियाविशेषण आणि नाम ह्या दोन्ही रूपांत वाचून बघावा.
२.ठरणे- (१) निश्चित होणे, निर्णय होणे, निश्चित करणे (२) थांबणे किंवा राहणे; एखाद्या जागी स्थायिक होणे; टिकणे, टिकून राहणे,
हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने
डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने
जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने
पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने
घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने
मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने
सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने
दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून२ जावे आनंदाने
जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने
— चित्तरंजन
१."आनंदाने" हा शब्द, लागू होऊ शकेल तिथे, क्रियाविशेषण आणि नाम ह्या दोन्ही रूपांत वाचून बघावा.
२.ठरणे- (१) निश्चित होणे, निर्णय होणे, निश्चित करणे (२) थांबणे किंवा राहणे; एखाद्या जागी स्थायिक होणे; टिकणे, टिकून राहणे,
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा वा!
प्रे. मीरा फाटक (शुक्र., ०९/०३/२००७ - ११:३७).
आहाहा
प्रे. लिखाळ (शुक्र., ०९/०३/२००७ - ११:४५).
फार सुंदर गजल
प्रे. मोगॅम्बो (शुक्र., ०९/०३/२००७ - १२:२१).
डोळ्यामधले
प्रे. कामिनी केंभावी (शुक्र., ०९/०३/२००७ - १२:२९).
अप्रतिम
प्रे. माफीचा साक्षीदार (शुक्र., ०९/०३/२००७ - १३:१५).
सुंदर
प्रे. कारकून (शुक्र., ०९/०३/२००७ - १३:५६).
सुरेख!
प्रे. प्रियाली (शुक्र., ०९/०३/२००७ - १३:५८).
छान...
प्रे. माधव कुळकर्णी (शुक्र., ०९/०३/२००७ - १४:११).
वा!
प्रे. रोहिणी (शुक्र., ०९/०३/२००७ - १४:२५).
छान
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., ०९/०३/२००७ - १६:०५).
आनंदाने...
प्रे. सन्जोप राव (शुक्र., ०९/०३/२००७ - १६:३९).
जाण्याची घटका आली की अवतीभवती
प्रे. मानस६ (शुक्र., ०९/०३/२००७ - १७:२८).
मिळालीच तर अशी देखणी
प्रे. चक्रपाणि (शनि., १०/०३/२००७ - ०१:०५).
छान/शंका
प्रे. हसवणूक (शनि., १०/०३/२००७ - ०१:१७).
माफीपत्र
प्रे. हसवणूक (शनि., १०/०३/२००७ - १५:१८).
आनंदाने
प्रे. सर्वसाक्षी (शनि., १०/०३/२००७ - ०५:०५).
वा!
प्रे. साती (शनि., १०/०३/२००७ - ०५:३१).
आनंदी आम्हीही...!!
प्रे. बेभान (शनि., १०/०३/२००७ - १३:११).
गझल उत्तम आहे पण
प्रे. चोखंदळ (शनि., १०/०३/२००७ - १७:४५).
गज़ल
प्रे. जीवन जिज्ञासा (मंगळ., १३/०३/२००७ - ०२:४२).
शेवयाची खीर आणि केशर
प्रे. सन्जोप राव (रवि., ११/०३/२००७ - ०१:०२).
आणखी..
प्रे. अभिजित पापळकर (रवि., ११/०३/२००७ - ०८:२९).
धन्यवाद।एक चांगली सुचवणी
प्रे. चित्त (रवि., ११/०३/२००७ - ०९:३३).
सुरेख!
प्रे. शशांक (रवि., ११/०३/२००७ - १९:१८).
वा..
प्रे. केशवसुमार (सोम., १२/०३/२००७ - ०७:४३).
