ऋतू येत होते ऋतू जात होते

ऋतू येत होते ऋतू जात होते

ऋतू येत होते ऋतू जात होते
हवामान पंडीत कोड्यात होते

किती गोठले शब्द ह्यांचे प्रवाही!
नवे काय त्या हिवाळ्यात होते?

किती जाहले मग्न मी देवळात
तरी चित्त माझे प्रपंचात होते!

कशाला तयारी नव्याने लढाया ?
भले का कुणाचे विनाशात होते!

करा हात ओला, तसे काम होते
 बघा नाव त्यांचे, पुढाऱ्यात होते

दिले काय त्यांनी ,कुणाला कधी ते
वसूली कराया हिशोबात होते

रडे ती कशी आज प्रत्येक वेळी?
(तिचे लक्ष  आधी हिशोबात होते)

शिवाशीव होती; घरे दूर होती.
(इथे भेद  गोरे तिमीरात  होते)

- कारकून

वैभव जोशी ह्यांच्या गझल कार्यशालेतील जमीनीवर आधारित
सौजन्य- मायबोली