म्हणींच्या राज्यातील फेरफटका

        विविध भारतीय भाषांतील म्हणींचा एक अनोखा संग्रह नुकताच वाचनात आला. त्याचे नाव आहे 'भारतीय कहावत संग्रह' आणि त्याचे संपादक आहेत श्री. विश्वनाथ नरवणे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, पंजाबी, सिंधी, काश्मिरी, बंगाली, आसामी, ओडिया, तेलुगु, तामिळ, मल्याळम,कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांतील म्हणी या संग्रहात आहेत.एखादी उक्ती, एखादा विचार घेऊन त्या आशयाच्या या सर्व भाषांतील म्हणी या संग्रहात दिल्या आहेत. सर्व म्हणी देवनागरीत असून त्यांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर दिले आहे. हिंदीत राजस्थानी, भोजपुरी, संबळपुरी, तसेच चंपारन, दरभंगा,भागलपुर, शाहाबाद इत्यादि जिल्ह्यातील बोलीभाषांमधल्या म्हणींचा समावेश केला आहे तर मराठीत कोंकणी, गोव्याकडच्या म्हणीही दिल्या आहेत. या संग्रहाचे तीन खंड असून पहिल्या दोन खंडात समानार्थी म्हणी असून ज्यांचे वर्गीकरण होऊ शकले नाही अशा म्हणी  तिसऱ्या खंडात आहेत. हा संग्रह वाचून जी रोचक माहिती मिळाली त्यातली थोडीशी तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा लेखप्रपंच.
        भारतीय भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव असल्यामुळे संस्कृत वचनात दिलेले दृष्टांत इतर भाषांतील म्हणीतही आढळतात. उदाहरणार्थ 'निरस्तपादपे देशे एरण्डोपि द्रुमायते' या अर्थाच्या आणि हाच दृष्टांत वापरलेल्या म्हणी बहुतेक सर्व भाषांत आढळतात. मराठी' ओसाड गावी एरंड बळी', गुजराती 'उज्जड गाममां एरंडो प्रधान', आसामीत'गछ नोहोवा ठाइत एराइ बिरिख' या सर्व म्हणींचा शब्दश: अर्थ एकच आहे. अशाच शब्दश: अर्थाच्या तेलुगु, बंगाली आणि मल्याळम म्हणीही आहेत.
        सुविद्य लोकांच्या संभाषणात संस्कृतोद्भव म्हणींचा वापर असतो. पण त्याच आशयाच्या म्हणींमध्ये खेड्यातले लोक त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींचा दृष्टांत देतात. एरण्डाची जागा गाय घेते आणि 'वासरात लंगडी गाय शहाणी' होते. 'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण होते'. हिंदीत' अंधो में काना राजा' होतो. तेलुगुत 'बिनगायींच्या गावात वांझ म्हैस महालक्ष्मी' होते̱. ग्रामीण भागातील लोकांचा संबंध पशु,शेती, शेतीची अवजारे, ग्रह-तारे, ढग, पाऊस या सर्वांशी असतो म्हणून त्यांच्या म्हणीतील दृष्टांतही या विषयांशी संबंधित असतात.
         भौगोलिक परिस्थिती, खाण्यापिण्याच्या पद्धती, चालीरीती या सगळ्यांचा प्रभाव म्हणींवर होत असतो.बंगाली, आसामी,ओडिया आणि मल्याळम भाषिकांमध्ये बरेचसे मत्स्याहारी. त्यामुळे त्यांच्या म्हणींमध्ये मासळीचा उल्लेख फार वेळा येतो. अयोग्य व्यक्तीला एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली तर काय होते याचे वर्णन  एका बंगाली म्हणीत  केले आहे. तिचा अर्थ असा आहे की नीट रांधता न येणारीच्या हातात पडल्यावर रोहू मासळी रडते अशासाठी की ही मला कशी काय रांधेल कुणास ठाऊक. 'चिंगुडि चिपिले मुण्डरे पित' ही ओडिया  म्हण आहे. चिंगुडी ही एक छोटी मासळी. ही अतिशय पित्तकारक असते. तिला नुसते बोटाने चेपले तरी डोके दुखते असा या म्हणीचा अर्थ. (मासे बोटाने चेपून ते ताजे आहेत की नाहीत हे ठरवतात.) निसर्गातील बदलाची चाहूल आधीच लागते असे सांगणारी एक ओडिया म्हण 'गरजंति मेघ, बरषंति पाणी, उठंति गडिशा (माशांचा एक प्रकार), बेळकाळ जाणि'. 'भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत'या अर्थाची एक बंगाली म्हण' पेट भरले भाजा माछ ( भाजलेली मच्छी) घसि-घसि (शेणासारखी) लागे'. 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत'ही म्हण मल्याळममध्ये झिंग्याची उडी गुडघ्यापर्यंत या अर्थी आहे. काश्मिरी लोकांच्या जेवणात भाताचे प्रमाण अधिक म्हणून त्यांच्या आहाराविषयी ही म्हण प्रचलित आहे' आओ कश्मिर अलबत्ता, खाओ कळहम का साग, भत्ता'    विविध भारतीय भाषांतील म्हणींचा एक अनोखा संग्रह नुकताच वाचनात आला. त्याचे नाव आहे 'भारतीय कहावत संग्रह' आणि त्याचे संपादक आहेत श्री. विश्वनाथ नरवणे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, पंजाबी, सिंधी, काश्मिरी, बंगाली, आसामी, ओडिया, तेलुगु, तामिळ, मल्याळम,कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांतील म्हणी या संग्रहात आहेत.एखादी उक्ती, एखादा विचार घेऊन त्या आशयाच्या या सर्व भाषांतील म्हणी या संग्रहात दिल्या आहेत. सर्व म्हणी देवनागरीत असून त्यांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर दिले आहे. हिंदीत राजस्थानी, भोजपुरी, संबळपुरी, तसेच चंपारन, दरभंगा,भागलपुर, शाहाबाद इत्यादि जिल्ह्यातील बोलीभाषांमधल्या म्हणींचा समावेश केला आहे तर मराठीत कोंकणी, गोव्याकडच्या म्हणीही दिल्या आहेत. या संग्रहाचे तीन खंड असून पहिल्या दोन खंडात समानार्थी म्हणी असून ज्यांचे वर्गीकरण होऊ शकले नाही अशा म्हणी  तिसऱ्या खंडात आहेत. हा संग्रह वाचून जी रोचक माहिती मिळाली त्यातली थोडीशी तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा लेखप्रपंच.
        भारतीय भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव असल्यामुळे संस्कृत वचनात दिलेले दृष्टांत इतर भाषांतील म्हणीतही आढळतात. उदाहरणार्थ 'निरस्तपादपे देशे एरण्डोपि द्रुमायते' या अर्थाच्या आणि हाच दृष्टांत वापरलेल्या म्हणी बहुतेक सर्व भाषांत आढळतात. मराठी' ओसाड गावी एरंड बळी', गुजराती 'उज्जड गाममां एरंडो प्रधान', आसामीत'गछ नोहोवा ठाइत एराइ बिरिख' या सर्व म्हणींचा शब्दश: अर्थ एकच आहे. अशाच शब्दश: अर्थाच्या तेलुगु, बंगाली आणि मल्याळम म्हणीही आहेत.
        सुविद्य लोकांच्या संभाषणात संस्कृतोद्भव म्हणींचा वापर असतो. पण त्याच आशयाच्या म्हणींमध्ये खेड्यातले लोक त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींचा दृष्टांत देतात. एरण्डाची जागा गाय घेते आणि 'वासरात लंगडी गाय शहाणी' होते. 'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण होते'. हिंदीत' अंधो में काना राजा' होतो. तेलुगुत 'बिनगायींच्या गावात वांझ म्हैस महालक्ष्मी' होते̱. ग्रामीण भागातील लोकांचा संबंध पशु,शेती, शेतीची अवजारे, ग्रह-तारे, ढग, पाऊस या सर्वांशी असतो म्हणून त्यांच्या म्हणीतील दृष्टांतही या विषयांशी संबंधित असतात.
         भौगोलिक परिस्थिती, खाण्यापिण्याच्या पद्धती, चालीरीती या सगळ्यांचा प्रभाव म्हणींवर होत असतो.बंगाली, आसामी,ओडिया आणि मल्याळम भाषिकांमध्ये बरेचसे मत्स्याहारी. त्यामुळे त्यांच्या म्हणींमध्ये मासळीचा उल्लेख फार वेळा येतो. अयोग्य व्यक्तीला एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली तर काय होते याचे वर्णन  एका बंगाली म्हणीत  केले आहे. तिचा अर्थ असा आहे की नीट रांधता न येणारीच्या हातात पडल्यावर रोहू मासळी रडते अशासाठी की ही मला कशी काय रांधेल कुणास ठाऊक. 'चिंगुडि चिपिले मुण्डरे पित' ही ओडिया  म्हण आहे. चिंगुडी ही एक छोटी मासळी. ही अतिशय पित्तकारक असते. तिला नुसते बोटाने चेपले तरी डोके दुखते असा या म्हणीचा अर्थ. (मासे बोटाने चेपून ते ताजे आहेत की नाहीत हे ठरवतात.) निसर्गातील बदलाची चाहूल आधीच लागते असे सांगणारी एक ओडिया म्हण 'गरजंति मेघ, बरषंति पाणी, उठंति गडिशा (माशांचा एक प्रकार), बेळकाळ जाणि'. 'भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत'या अर्थाची एक बंगाली म्हण' पेट भरले भाजा माछ ( भाजलेली मच्छी) घसि-घसि (शेणासारखी) लागे'. 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत'ही म्हण मल्याळममध्ये झिंग्याची उडी गुडघ्यापर्यंत या अर्थी आहे. काश्मिरी लोकांच्या जेवणात भाताचे प्रमाण अधिक म्हणून त्यांच्या आहाराविषयी ही म्हण प्रचलित आहे' आओ कश्मिर अलबत्ता, खाओ कळहम का साग, भत्ता'
        महाराष्ट्रात गुळाचे उत्पन्न भरपूर. जेवणात, पक्वान्नातही गुळाचा सर्रास वापर केला जातो. म्हणून 'बंदर क्या जाने अद्रकका स्वाद' ही म्हण मराठीत 'गाढवाला गुळाची चव काय' अशी होते. तीच म्हण काश्मिरीत 'खर क्याह जानि जाफुरानक कदुर' (गाढवाला केशराची काय कदर)  होते. आसामी, ओडिया, मल्याळम भाषांतील म्हणींत नारळाला अमुल्य मानले आहे. म्हणून आसामी म्हण आहे 'बांदरे कि जाने नारिकलर मोल'. तामिळ आणि मल्याळम या भाषांत माकडाची जागा कुत्र्याने घेतली आहे. शेतकऱ्याला शहाळ्याच्या पाण्याच्या चव काय. त्याच्या लेखी ते तांदळाचे पाणी आहे अशा अर्थाची एक ओडिया म्हण आहे.
        म्हण कशी मधमाशीसारखी असावीड़ंखही असावा, मधही असावा आणि सुटसुटीतही असावी. या तीन गुणांबरोबर अनुप्रास असेल तर दुधात साखर. अनुप्रासामुळे म्हणी सहज मुखोद्गत होतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात. नमुन्यादाखल या काही म्हणी.
        मराठी--हपापाचा माल गपापा.
                आला भेटीला, धरला वेठीला.
                जशी देणावळ तशी धुणावळ.
       बंगाली--परेर खाई घरेर गाई (दुसऱ्याचे खाईन, घरचे गुण गाईन)
        तेलुगु--मीकु माट माकु मूट (तुम्हाला शिव्या, आम्हाला गाठोडे )
        साहित्यालंकाराने नटलेल्या अशा कितीतरी म्हणी आहेत. 'आबरू जग में रहे तो जान जाना पश्म है' या उर्दू उक्तीचा सरळ अर्थ असा आहे की अब्रूपुढे जीव केसासमान तुच्छ आहे. पश्म म्हणजे केस. पण ही उक्ती श्लेषालंकाराचे उत्तम उदाहरण आहे. लखनौमध्ये 'आबरू' आणि 'जान जाना' नावाचे दोन शायर होते. त्यांची आपापसात खूप छेडछाड होत असे. आपापल्या शायरीतून ते एकमेकांची नेहमी रेवडी उडवत. वरील शेर आबरूचा आहे ज्यात त्याने  जान जानाला पश्म म्हटले आहे. पूर्ण शेर असा आहे.
        जो सती सतपर चढै तो पान खाना रस्म है
        आबरू जग में रहे तो जान जाना पश्म है
शब्दांचे खेळ करणारी अशीच एक हिंदी म्हण--चाकर है तो नाचा कर, ना नाचे तो ना चाकर .उर्दूमध्ये एखाद्याला सरळ सरळ मूर्ख किंवा उल्लू न म्हणता 'आदमी हो या बेदाल के बूदम' असे म्हणतात. दाल म्हणजे फारसी अक्षर 'द'.बूदममधून द काढून टाकला की उरते फक्त बूम आणि बूम म्हणजे उल्लू. असेच एखाद्याला कुत्रा म्हणायचा हा प्रकार. 'आदमी हो या संग-ए-बे नून'. संग-ए-बे नून म्हणजे अनुस्वाररहित संग. संग म्हणजे पत्थर. संगमधून अनुस्वार काढला तर रहातो सग म्हणजेच कुत्रा. 
        आता अतिशयोक्तीपूर्ण म्हणीचा नमुना-अडक्यांचे तेल आणले, सासुबाईंचे न्हाणे झाले, मामंजींची शेंडी झाली, उरले सुरले झाकून ठेवले,ते येऊन मांजराने सांडले, वेशीपर्यंत ओहोळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला.
        आपल्या दोषांचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याच्या वृत्तीवर एक हिंदी म्हण अशी आहे--सोना कहे सुनारसे, " उत्तम मेरी जात
             काले मुंह की घुंगची तुले हमारे साथ"  घुंगची म्हणजे गुंज. सोने तोलण्यासाठी गुंजा वापरतात. गुंजा दोन प्रकारच्या असतात. एक संपूर्ण लाल आणि दुसऱ्या लाल रंगाच्याच पण त्यावर काळे डाग असलेल्या.सोनाराकडे सोने तक्रार करत आहे की माझी जात उत्तम पण काळतोंड्या गुंजांबरोबर तोलल्यामुळे मला बट्टा लागतो. यावर गुंजेचा सडेतोड जबाब असा की-- हम लालों की लालडी, लाल हमारा रंग
                                          काला रंग जबसे हुआ तुली नीचे के संग
मराठीतही अशीच चंदनाची तक्रार आहे--चंदन म्हणते सहाणबाई तुझी हीन जाती
                                          तुझिया संगे झाली माझ्या देहाची माती
वास्तविक सहाणेच्या संगत्त्तच चंदनाचे गुण वाढीस लागतात.
        स्त्रीच्या संगतीत पुरुषाचे अस्तित्वच नष्ट होते असे सांगणारी एक मजेदार गुजराती म्हण-- दाळनी सोबतथी चोखो नर मटी नारी बन्यो. याचा अर्थ असा की डाळीच्या संगतीत तांदूळ नराचा नारी झाला. डाळ स्त्रीलिंगी, तांदूळ पुल्लिंगी पण दोघांची मिळून जी खिचडी बनते ती मात्र स्त्रीलिंगी.
        एवढे मोठे भांडार माझ्यापुढे खुले आहे त्यातले काय लिहू आणि काय नको असे मला झाले आहे. पण सध्या इथेच थांबते. जाता जाता या संग्रहाची थोडीशी झलक दाखवते. .
                   आशय--- नाव मोठे, लक्षण खोटे  
        मराठी--- अक्कल नाही काडीची नि नाव सहस्रबुद्धे.
                  नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर उरेना.
                  नाव गंगाबाई, रांजणात पाणी नाही.
                  नाव महीपती, तिळभर जागा नाही हाती.
                  नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.
                  नाकाला नाही जागा आणि नाव चंद्रभागा 
                  नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण.  
        उर्दू----  आंख न नाक, मैं चांदसी 
                  आंखोके अंधे, नाम शेख रोशन 
                  ऊंटसे बडे, और नाम छोटे खान
                  डरे लोमडीसे, नाम दिलेरखान 
                  पढा न लिक्खा, नाम महंमद फाजिल
                  बदन में दम नहीं, नाम जोरावर खान
                  रंग कव्वे सा, और महताब(चंद्र) नाम 
        हिंदी---- आंख गड्डू, नाक मड्डू, सोहनी (सुंदर) नाम 
                   आंखो का अंधा, नाम नयनसुख
                   आल न दोम, नांव पंचकल्यान                                                   ( ना आयाळ  ना शेपूट आणि घोड्याचे नाव पंचकल्याण )
                   आवे न जावे, बृहस्पती कहलावे
                   उखरै बार नै नाम बरिआर के
                  ( केस उपटता येत नाही आणि नाव बली.) 
                   करनी कुत्ता के, नांव लछनदेव 
                   कानी कोडी पास नही, नाम करोडीमल 
                   जनम के कमबख्त (कमनशीबी), नाम बख्तावरसिंघ
                   जनम के मंगता, नाम दाताराम
                   झाड मान झूंपडी, तारागढ नाम 
                   (झुडुपाएवढी झोपडी, तिचे नाव तारागढ ) 
                   नाम पहाडसिंह, देह चिआं (चिंचुका) अस
                   नाम निर्मलदास, देह भर दादै दाद 
                   नाम हीरालाल, दमक कंकर सी भी नही
                   नाव कपूरचंद, गन्ह(गंध) गोबर  
                   नाव कुमारी, काम सतभतारी 
                   नाव दूधनाथ, लज्जित मठ्ठो के न (ताक ही चाखले नाही)
                   पढा न लिक्खा, नाम विद्याधर 
                   पहरणनै तो घागरो ही कोनी, नांव सिणगारी
                   (नेसायला घागरा नाही आणि नाव सिंगारी)
                    नाव धर्मात्मा, पून के लेसे न (पुण्याचा लेशही नाही)