मराठी नववर्षाच्या शुभेच्छा व संकल्प-

Gudi Padwa

हिंदू व मराठी नववर्ष चैत्र शुद्ध पाडवा (गुढीपाडवा) निमीत्त सर्व मनोगतींना हार्दिक शुभेच्छा !

Door hangingsDoor hangingsDoor hangings

संकल्प -
ह्या शुभदिनी संकल्प करूया की मराठी भाषेतील वर्तमान पत्रांत (म.टा. ; लोकसत्ता; सकाळ; लोकमत इ. ) लिहील्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांबद्दल लिखीत तक्रार त्या त्या वर्तमानपत्रांच्या संपादकांकडे करण्याचा !

आवाहन-
सर्व मनोगतींना मी आवाहन करू इच्छीतो की मोठ्या संख्येने आपण पत्रे माझ्यापर्यंत पोहचती केल्यास म.टा. व लोकसत्ता च्या संपादकांपर्यंत निवडक मनोगतींना सोबत घेऊन मी स्वहस्ते ही पत्रे त्यांच्या सुपुर्द करीन ! इच्छुकांना पत्ता व्य. नि. मार्फत कळवण्यात येईल.
आपला लिफाफा ज्या दिवशी पत्र संपादकांना द्यायचे नक्की होईल तोवर उघडण्यात येणार नाही व पत्र सुपुर्त करण्यापूर्वी सर्व लिफाफे एकदमच उघडून फक्त पत्रे एकत्रीत स्वरूपात देण्यात येतील. (जेणेकरून कोणाचीही ओळख/पत्ते मला स्वतःला/इतरांना कळणार नाही)  

पत्र / तक्रारीचा मसुदा कोणीतरी येथे प्रतिसादात दिल्यास मनोगतींना पत्र लेखनास मदत होईल असे वाटते. सोबत आपण वाचलेल्या बातमीचे कात्रण लावल्यास त्या तक्रारीचे वजन वाढेल असेही वाटते. ज्यांनी बातमी संकेतस्थळावर वाचली असेल त्यांनी त्या दिवसाची तारीख व बातमीचा ठळक मसुदा पत्रात नमुद करावा.

कृपया ह्या उपक्रमाबाबत अधिकाधीक सुचना व सुचवण्या करून मार्गदर्शन करावे जेणेकरून अत्यंत शिस्तबद्दतेने हा उपक्रम राबवता येईल.  

सर्व पत्रे १९ एप्रिल २००७ पुर्वी (अक्षय तृतीया) पोहचतील ह्या बेताने पाठवावीत व जास्तीत जास्त मनोगतींनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
धन्यवाद-