मार्च
२८
२००७
तुझे गोड गाणे
मना वेड लावी तुझे गोड गाणे
खळाळून वाही तुझे गोड गाणे
कितीदा क्षणांन्ना विस्मरून जावे
मन्तरून जाई तुझे गोड गाणे
कुणा पारव्याची घुमे शीळ रानी
तरंगे मनाशी तुझे गोड गाणे
कुठे शांत माझे अबोले उसासे
गन्धाळून देही तुझे गोड गाणे
उदासीन होते किनारे दिलाचे
कशी ओढ लावी तुझे गोड गाणे
कळीबंद स्वप्ने, धुके आर्जवी ती
जशी गोड चोरी - तुझे गोड गाणे!!
वाचकहो, इथे प्रथमच गझल लिहीत आहे. चुका माफ करा.
- आ. चिन्नु
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा
प्रे. केशवसुमार (गुरु., २९/०३/२००७ - ०३:५६).
धन्यवाद!
प्रे. चिन्नु (गुरु., २९/०३/२००७ - २०:३६).
