मार्च ३० २००७

शब्द

शब्दांनी मी उन्मळतो
शब्दांनी मग सावरतो!

मी लिहितो अलगद मग तो
वाचून मला उलगडतो

जाणून मनीचे संभ्रम
तो फुटताना अडखळतो

मजह्रदयी किल्मिष नाही
मग तोल तुझा का ढळतो?

ओठावर येऊ पाहे
डोळ्यातच पण ओघळतो

मी तोच - तुझा आवडता
मोहरतो, ओठी फुलतो!

चित्ताच्या चरख्यावरती
अर्थाचे धागे विणतो!

-- पुलस्ति

वा..
मी लिहितो अलगद मग तो
धन्यवाद
सुंदर

Typing help hide