शब्द लाघव.

शब्द हे कधी कधी सजीवाप्रमाणे आपल्या मनाशी बोलत असतात. काही शब्दांचा उच्चार केला तरी मन प्रसन्न झाल्यासारखे वाटते.

मला मराठीतील काही शब्द फार आवडतात. त्यांचा उच्चार आणि शक्य असेल तेथे वापर मला आणि इतरांनाही प्रसन्नता देतात असा माझा अनुभव आहे.

मला खालील शब्द आवडतात,

स्नेह, इंधन, तुषारस्नान, सम्यक, अक्रमिक, गजसारथी, प्रगण, जनपद आणि गोंडस इत्यादी इत्यादी.

तुम्हाला काही शब्द आवडता का? त्यांचे लाघव पटते का? काहीही विचार न करता असे शब्द तुमच्या मनात येत आहे काय?

द्वारकानाथ

(पेट्रोल भरतांना मी इंधन असा शब्द वापरताच मित्र बघत राहतात, शॉवर बाथ साठी तुषार स्नान हा शब्द वापरताच प्रत्यक्ष स्नान झाल्यासारखे वाटते, गजसारथी वापरताना हत्ती पेक्षा माहूत मोठा वाटतो, जिल्हा आणि तालुका पेक्षा जनपद आणि प्रगण शब्द मनाला खरी जाणीव देत असतात असे नकळतच वाटत जाते, गोंडस शब्द वापरताना एखादे लहान बाळ समोर आहे असेही वाटत जाते.)