गझल:'भेटणे नाही अता'

ही गझल 'मराठीगझल.कॉम' वरील गझल कार्यशाळेसाठी लिहली होती. ती येथे देत आहे.

'भेटणे नाही अता'

हुंदका साधा तुझा सांगून गेला
'भेटणे नाही अता' बोलून गेला

काळ तो, त्याला कुणाची काय पर्वा
तो हवे त्याला तसे वागून गेला

नेत होते ते तुला ओढून जेंव्हा
कोणता तो शाप मज थिजवून गेला?

स्वप्न माझे हे असे सजते कशाला?
व्हायचा तो सोहळा होऊन गेला

राख़ आशा,राख स्वप्ने,राख सारे
हुंदका माझ्या जगा जाळून गेला

(जयन्ता५२)