बीटाचे सूप

  • मध्यम आकराचे बीट रूट
  • १ गाजर, १ कांदा
  • १ टोमॅटो
  • १ हिरवी मिरची
  • आलं १/२ "
  • मीठ, बटर २ टी स्पून, मिऱ्याची पावडर थोडी.
१५ मिनिटे
४ जण

प्रथम बीट रूटची सालं काढून त्याचे ३-४ मोठे तुकडे करून घ्यावे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, गाजर याचे ही मोठे तुकडे करून घ्यावेत. प्रेशर कुकरमध्ये थोडे बटर घालून ते विरघळले की त्यावर ह्या चिरलेल्या सगळ्या भाज्या आणि आल्याचा तुकडा घालून चांगले परतून घ्यावे. त्यानंतर भाज्या बुडतील इतकेच पाणी घालून या भाज्या कुकरला शिजवून घ्याव्यात.

त्यानंतर, भाज्या गार झाल्या की त्यांची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. एका पातेल्यात उरलेले बटर घालून ते विरघळले की मिरचीचे बारीक तुकडे करून त्यात घालावेत आणि ही भाज्यांची केलेली पेस्ट घालून चांगले हालवून घ्यावे.

त्यानंतर त्यात अंदाजे पाणी घालून मिश्रण थोडे पातळ करावे. खूप पातळ करू नये. आता त्यात चवीप्रमाणे मीठ, मिऱ्याची पावडर घालावी. उकळी आली की गॅस बंद करावा. सर्व्ह करताना त्यावर थोडे क्रीम घालून द्यावे.

हे सूप पौष्टिक आहे. लहान मुलांना देताना मिरचीचे तुकडे घालू नयेत.

मैत्रिण