माउस

चित्त ह्यांच्या आग्रहास्तव हे विडंबन इथे टाकत आहे

चाल : संदीपची गजल

पाऊसही

तुझ्या माझ्यासवे बोलायचा माऊसही
तुझ्या ईमेलना, वाचायचा माऊसही

कधी याहूवरी मी जर तुझ्याशी भांडलो
कसा कीबोर्डला, झापायचा माऊसही

गुलाबी-गोड गोष्टी चॅटवर तुज सांगता
तुझ्या इतुकाच मग, लाजायचा माऊसही

उगा गुरकावली ती बॉस, तर नावे तिच्या
कशी बटणे तिन्ही, मोडायचा माऊसही

समोरच स्कर्टवाली सुंदरी जर बैसली
कसा हलकेच खाली, यायचा माऊसही

अचानक कोड माझा चालताना पाहुनी
पुन्हा क्लिक क्लिक असा, नाचायचा माऊसही

कसा मज साथ सुख-दु:खामध्ये तो द्यायचा
सदा दोस्ती अशी, निभवायचा माऊसही