आमची प्रेरणा बैरागी यांची कविता वाजला किती पाऊस...
वाजले किती ते१ सांग |
न आली जाग |
जरा डोळ्यांना ||
नेमका विसरलो बोळ |
कसा हा घोळ |
झाला रस्त्यात ||
दारात भेटला२ बाप |
मारली थाप |
मी नेहमीची ||
चोरून दिले मी फूल |
तरी चाहूल |
तिच्या बापा ये||
बाहेरी संततधार |
कशी जाणार |
घरी मी माझ्या||
विझू दे तेवता दिवा |
अरे "केशवा"|
जरासे थांब ||
१. 'बारा की' आधीच्या आवृत्तीत.
२. 'उभा हा' आधीच्या आवृत्ती.