चुकीची दुरुस्ती

पत्नी किंवा तुझी 
जर का ती प्रेयसी
असली
       फार दिसानी
       असेल तिजला
       जवळ घेतली
तर जे होइल
असेल कुजबुज
कानामधली 
      पण जर का ती
      नसेल यातिल
      दोन्हीमधली
खचित वाजविल
ती तुझिया रे
कानाखाली
पत्रामध्ये जी
मजला रे
चूक भासली
ऐसी येथे
प्रयत्न करुनी
दुरुस्त केली