मला कवी म्हणु नका !!
'कवी कसला मी' या शब्दांवीना मी तर मुका.......
स्वप्नातली ती खरी कहाणी
रोज सांगी शब्दातुनी
आजीच्या गोष्टीतल्या परीसारखी देखणी परी
माझ्याही आयुष्यात होती बरं का !!
रोज तिच्यासोबत सारी रात्र जागवी
पाही तो एक चंद्र आणि त्या लाखो तारका
तिच्यासाठी स्वप्न सजवी
स्वत:ला तिच्या डोळ्यात पाही
पण तिच्याशी बोलताना होई मुका
धीर करुन जेव्हा काही सांगु पाही
ती म्हणे
"अरे आता सकाळ झाली
आता मी निघु का?"
एकदा ती मला सोडुन गेली
सगळी स्वप्न तोडुन गेली
तीला नावाने मारुन दमलो
मी हजार हाका
केलं होतं मी पण प्रेम
पण मिळाला ना त्यात धोका
कारण मनातलं सांगायच
मिळाला ना कधी मोका
तुटले होतं ते स्वप्न
माझे तुटल्या त्या तारका
असाच एकदा विचार केला
जे आलय मनात
ते कागदावर लिहुन पाहु का?
पहील्यांदाच लिहिल्याने झाल्या
त्यात हजार चुका
शब्द होते होत्या भावना
पण त्यात नव्हती काव्यत्मकता
मला कवी म्हणु नका !!
मला कवी म्हणु नका !!
याच कवीतेमुळेच होतो मी त्यांच्यासाठी ’आपला’
आता त्यांच्यासाठीच आता झालोय मी 'परका'
कारण त्यांच्या भल्या मोठ्या जहाजासमोर घेऊन
फ़िरत होतो मी मोडक्या शब्दांची साधी नौका
मला कवी म्हणु नका !!
मला कवी म्हणु नका !!
मनात जे आलं तेच लिहीलय
भावनांना अलगद कागदावर उतरवलयं
डोळ्यातल्या त्या अश्रुंचा आता हिशोब मागु नका
मला कवी म्हणु नका !!
मला कवी म्हणु नका !!
आज जरी चुकलोय मी या भावना मैफ़ीलीत मांडताना
पण एक दिवस नक्किच चुकवीन मी तुमच्या काळजाचा ठोका
पण मला कवी म्हणु नका !!
मला कवी म्हणु नका !!
'त्या' आजीच्या गोष्टितली परी जशी देखणी आहे
सोबत माझ्याही तीच माझी कल्पनेतली लेखणी आहे
ती गोष्ट जरी खरी असली तरी ती मनावर घेऊ नका
मला कवी म्हणु नका !!
मला कवी म्हणु नका !!
**सचिन काकडे**