तू शब्द माझेच
की फक्त एक कल्पना,
स्पर्श माझा
की एक संवेदना...
तू हृदय माझे
की एक स्पंदन,
हास्य माझं
की एक सुखद क्षण...
तू ध्येय माझं
की फक्त प्रवास,
प्राण माझा
की फक्त एक श्वास...
तू माझंच प्रतिरूप
की एक सूक्ष्म सहवास,
तू माझ्यातलीच 'मी'
की फक्त एक आभास...
तू......
माझ्यातली 'मी'
की फक्त तुझ्यातलीच 'तू'....