असाच एका संध्याकाळी,
तू आयुष्यात चालत आलास,
माझ्याबरोबर चार क्षण वेचायला,
आणि बघता बघता माझ,
आयुष्यच बनुन गेलास.
स्वतः पेक्षा जास्त प्रेम,
तुझ्यावर केले,
हाती नव्हते बळ,
तरी तुला वाढविले.
तुझ्या आनंदासाठी,
मी माझेच आसू प्यालो.
तुझ्या प्रीतीमधे,
मी दंग होऊनि गेलो.
असाच एका संध्याकाळी,
तू परत आयुष्यात आलास,
पण या वेळेला मात्र,
माझ आयुष्यच घेऊन गेलास.
अमित बर्वे