(कातर)

अजबरावांची क्षमा मागून,

उघड मनोगत,
एक काव्य तू
समोर धर...
"करू विडंबन
याचे आता"
निश्चय कर...

ठाउक आहे
वृत्त पाळणे
सोपे नाही...
 मात्रावृत्ताला
निभावणे
सोपे नाही...

दुसऱ्याआधी
स्वतःच तू ही
चालव कातर...
काव्य कसेही
झाले तरी तू
विडंबने कर!

--अदिती
(१७ जुलै २००७
आषाढ शुद्ध ४,
शके १९२९)