चिंब पाखरे,
रान वासरे,
थेंब हासरे,
तरंग जळा..!
रिमझिम धारा,
टपोऱ्या गारा,
सोसाट्याचा वारा,
पाऊस कळा..!
ढगांचे पाणी,
ओली धरणी,
चातकाची गाणी,
निळ्या राती..!
गवताची पाती,
अंग नहाती,
थेंब स्वाती,
शिंपात मोती..!
नऊ नक्षत्रे,
परम पवित्रे,
ऐक धरित्रे,
पाऊसगान..!
नभाला तोरण,
झाडाला पैंजण,
मोराचे नर्तन,
हरपले भान..!
- मंजुश्री.