स्बअभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाचा कॉलेज मधला किस्सा:
सबमिशनची तारीख जवळ येउ लागली तसे सगळे विद्यार्थी आपापले प्रयोग-लेख (एक्सपेरिमेंट पेपर्स) पुर्ण करून सरांकडून तपासून घेत होते. माझा लेख सरांनी तपासायला घेतला आणि शेवटी सही साठी शेवटचे पान उघडले. आता एकदाची सही झाली की सुटलो बुवा ! अशा विचारात मी अधीरपणे वाट पहात मी टेबलाजवळ उभा राहीलो. तेवढ्यात सरांचे लक्ष एका आकृतीवर पडले आणि त्यांनी पेन्सीलने एक छोटी फ़ुली करून चूक दाखवली. "तेवढी चूक नक्की दुरुस्त कर बर कां " असे सांगून सही केली व माझा लेख पुर्ण झाला.
आधी लिहील्याप्रमाणे प्रयोग लेख पुर्ण करण्याची तारीख जवळ आल्याने सर्व विद्यार्थी धावपळीत होते. परप्रांतीय मुलांचा एक विशीष्ट गट, जो नेहेमी उशीरा पर्यंत लेख पुर्ण करीत असे, त्यातल्या एका विद्यार्थ्याने मी वर्गाबाहेर येताच, "क्या साईन हुआ क्या?" असे विचारले. मी "हो" असे म्हणताच त्याने माझ्या हातातील लेख दांडगाईने काढून घेतला. मी ईतर लेख तपासून घेण्यासाठी दुसऱ्या सरांच्या वर्गात शिरलो.
पुढील आठवड्यात लेख पुर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सुचना फ़लकावर लागलेली. त्यात ज्याने माझा लेख घेतला व त्याचे काही मित्र यांची नावे होती.
सरांनी मला पुन्हा बोलावले व "काही न बोलता ईथेच उभा रहा" असे सांगून त्या ४-५ जणाना बोलाविले. प्रत्येकाच प्रयोग लेख उघडून त्यातील आकृतीत लिहीलेल्या ईंग्रजी x या अक्षराबद्दल विचारले. कोणालाच उत्तर देता न आल्याने त्यांचे लेख राखुन ठेवण्यात आले होते. सरांना कळून चुकले की त्या विद्यार्थ्यांनी माझ्या प्रयोग लेखाची नक्कल केली होती.
माझी चूक मला कळली व सरांची मी माफ़ी मागीतली. "सर आपण विश्वास ठेउन मला सही दिलीत, पण या विद्यार्थ्यॉच्या दांड्गाई समोर माझे काही चालले नाही."
प्रामाणिकपणे काय घडले ते सांगीतल्याने , माझ्या प्रयोग लेखाची दुरुस्ती समोर करुन घेउन सरांनी त्यावर पडदा पाडला.
आपणांसही असे काही प्रसंग अनुभवास आले असतीलच !
विनम्र