एखादी कविता

हातातलं सौख्य

सुखाचं कौमार्य

सबंध बालपण

एखादी कविता...

झरझर आसवे

क्वचितच नजर

भिंतींचं सख्य

एखादी कविता...

तुझेही डोळे

शिल्लक थोडे

सुटं सुटं अवसान

एखादी कविता...

चंद्र मोकळा

निःसंग जोगवा

अंधार एकटा

एखादी कविता...

आर्त कुणाचे

मूल धडपडे

स्वदेह रडे

एखादी कविता...

अर्थ वादळ

नातं निरंतर

ओझ्याशी बोलताना

एखादी कविता...