एक रात्र..

एक धुंद रात्र सख्या
मी होते बावरी
सय तुझी ही दाटलेली
या माझ्या अंतरी

मूक भावनांचा खेळ
किती खेळावा परी
काळजातली हुरहूर तुझ्या
दाटली माझिया उरी

आतुरलेले क्षण सारे
साद घालिती तुझे नेत्र
प्रणयातूर जाहले मी
सर्वत्र तुझेच गात्र

धुंद जाहले गीत माझे
चुंबुन घे तू अधरी
एक रात्र सख्या आपुली
घे लपेटून तनूवरी...

- प्राजु.