प्रमोद खराडे यांच्या गझलेने प्रेरीत होऊन सुचलेली आमची ही 'गझल' (शेवटी खोडसाळाची गझलकार होण्याची सुप्त इच्छा समोर आलीच!):
सासऱ्यासाठी असे हा धोतरा
सासुला देतो अळू मी खाजरा
भोवती माझ्या जरी साऱ्या जणी
जागता पण बायकोचा पाहरा
मारकीला कोण सांभाळेच ना
मी दिला गोठ्यात माझ्या आसरा
फक्त हे माझे जरी खाते असे
त्यावरी वीटो 'ति'चा असतो खरा!
दोस्तहो येऊ नका दारेपुढे
हा असे निवडुंग भलता बोचरा
मी न आहे तो, तुम्ही जो वाचता
खोडसाळाच्या पहा ना अंतरा :(