अजब यांच्या पक्षी ची क्षमा मागून !
आज निराळी
सकाळ होती...
'घरमालक' येउन
बसला होता
दारावरती...
नुकता पगार
झाला होता
देणी भागवण्यातच
संपला होता...
मला वाटले,
त्या घरमालकाला
घरात घ्यावे...
अन एखाद्या
चाबकाने
कोरडे ओढावे (त्याच्या पाठीवर)...
कोनाड्याशी
उभी असावी
एक छडी...
रट्टे तिचे त्याला
खाऊ द्यावे...
'घरमालक' पण तो
'घरमालक' होता
'मनुष्य' नव्हता...(??)
पैसे टेकवता (आधीचे थकलेले)
पसार झाला
बघता-बघता...