स्वातंत्र्य-दिन चिरायू होवो !
व्यापार करावया पाश्चात्य येथे आले होते
व्यापार करता-करता राज्यकर्ते झाले होतेदीड शतका पर्यंत राज्य केले त्यांनी
अनन्वित हाल , मानहानी भोगली पूर्वजांनीआम्ही जन्मलो मूक्त स्वातंत्र्यांत
पूर्वजांच्या साकार झालेल्या स्वप्नांतस्वातंत्रासाठी ना दिले आम्ही मोल
त्यामुळे त्याचे ना वाटे आम्हा मोलहवेत आम्हाला आमचे हक्क
त्यासाठी चिरडून टाकू दुसऱ्याचे हक्क
आम्ही 'स्वतंत्र ' विध्वंसक आंदोलने करण्या
रस्ता,गाव,सारा देश बंद करण्या
हेच कां 'स्वातंत्र्य' हवे होते त्यांना ?
असले भयानक स्वप्न नसेल पडले त्यांना
आत्मक्लेशच होत असणार त्यांना ,
शांती नसेलच त्यांच्या आत्म्यांना !
चला ,येऊ या भानावर,
चला घेऊ या मनांवर
देशाला महाशक्तीशाली करायचे आहे
स्व-बळावर 'तिरंग्या'ला मंगळावर फ़डकवायचे आहेछोटे मोठे वाद मिटवूयात,धर्म-जाती विसरूयात
अतिरेक्यांना समजावून मिटवूयात,विश्वात अभिमानाने मिरवूयात !
स्वातंत्र्य-दिन चिरायू होवो ! चिरायू होवो !! चिरायू होवो !!!