१.
कसला धागा प्रिये तू अवचित भवती गुंफला
बघ तुझ्या श्वासात माझा जीव वेडा गुंतला
झेलले मी बाण सारे... परी तयांनी वेढले
स्निग्धशा आपुलकीने आसमंतही झिंगला !
२.
या नजरेला का अशी घालते साद
तू निघून जाता फिरून येते याद
हे काळीज गाते गाणे नवभरतीचे
मग बहरून येती तृणांकूर धरतीचे !
३.
ती निघून गेली अन माघारी उरल्या पाऊलखुणा
घरभर दिसती जरी माणसे, मी तिच्यावाचुनी उणा
ती हवीहवीशी मज वाटते... सकाळ - संध्याकाळ
परी धुसर धुक्याची विण उकलणे नशिबी पुनः पुन्हा !