पोटात सांजवेळी रेटू नकोस लोणी
त्या मिरच्या भजीवर पिऊन ग्लासभर पाणी
खाण्यात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेंव्हा नको पिऊ तू शिळकट काजूफ़ेणी
वाटीवरी तुपाच्या चाटू नको थेंब ते
ना ठेविजे फ़ळांची पाटी इथे रिकामी
वाडगा इथे तुपाचा चाटून साफ़ घ्यावा
उपवास हा फ़ुकाचा आहे तुला निकामी
पळणार हाय नाही माझी तुंदील तनु ही
मी झब्ब्यात माझ्या ही झाकिली गोलाई