कोंबडी (मध्यम आकाराचे तुकडे) स्वच्छ धुऊन घ्यावी. त्या तुकड्यांना मीठ, हळद आणि आले-लसूण वाटण लावून एक तास मुरवत ठेवावे.
ढबू मिरचीच्या पातळ लांब फोडी (डोसाभाजीला कांदा कापतो तशा) करून घ्याव्यात.
कोंबडी कुकरमध्ये एक शिटी, मग ज्योत बारीक करून पाच मिनिटे अशी शिजवून घ्यावी. वाफ जिरल्यावर झाकण उघडून वातावरणाच्या तापमानाला आणावी.
तेल कडकडीत गरम करून त्यात ढबू मिरचीचे काप घालून चांगले परतावे व ज्योत बारीक करावी.
त्यात गरम मसाला, मीठ व कोंबडी शिजताना सुटलेले पाणी घालून पाच मिनिटे शिजू द्यावे.
त्यात कोंबडीचे तुकडे घालून कमी आचेवर कोंबडी संपूर्ण शिजेस्तोवर झाकण न ठेवता परतावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. पण हा पदार्थ रश्श्याचा नाही, कोरडसरच आहे.
कोरडे असल्याने पोळी/भाकरी/पाव यासोबतच बरे लागते.
स्वप्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.