मी लहान असताना म्हणजे शाळेत १९९४ मध्ये पहिलीत असताना एक घटना घडली होती. जी मला आजही सतवतेय? माझ्या शाळेचे नाव ज्ञानसागर विद्यालय आहे.मी शाळेत पहिलीत असताना दुपारी शाळा सुरू झाल्यावर वर्गात बसलो होतो व माझ्यापुढे एक मुलगी बसली होती.त्यात पावसाचे दिवस चालू होते. काय म्हणू त्या मुलीला एक नंबरची कुसकी होती,नाही तर काय? शाळा सूरु झाल्यानंतर ती वर्गात माझ्या पुढच्या बाकावर ती बसली. आणि आमच्या वर्गातल्या बाई आम्हाला शिकवत होत्या. त्यामध्ये मी एक वेडा.मी माझ्या वहीचे पान माझ्या तोंडात टाकुन चघळत होतो. चघळता चघळता फूक मारल्यावर तोंडामधले वहीचे पान तीच्या शर्टावर जाऊन पडले.आणि आता काय आता तर माझी वाटच लागली होती. ती मुलगी बाकावरून ऊठली व सरळ बाईंकडे जाऊन माझे नाव सांगितले, की बाई हा समीर माझ्या शर्टावर थुंकला.
आणि आता काय त्यामध्ये अजून एक भर म्हणजे बाई पण एकदम कठोर व एक नंबरच्या मारकुट्या होत्या.बाई सरळ मार्गानेच माझ्याकडेच आल्या. व मला म्हणाल्या " काय झाल समीर ? का थुकलास तू हिच्या शर्टावर? मी तर एकदम गार पडलो होतो.त्यावेळी माझ्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडले ते होते "बाई मी तर थुकलोच नाही".बाई तर अजून भडकल्या कारण मी खोट बोलतोय हे बाईना समजले.मग काय घेतली लाकडी पट्टी आणि दिला मला प्रसाद (आता प्रसाद म्हणजे समजा हो "मार" ,हा शब्द बोलायला पण लाज वाटते म्हणून बाकी काही नाही).प्रसाद दिल्यावर बाई शेवटी म्हणाल्या उद्या शाळेत येताना आईला घेऊन ये, नाही तर वर्गात येऊ नकोस.मग त्यादिवशी घरी गेल्यावर एकच प्रश्न की आता आईला सांगू कसे ? मग चांगालाच उत्साह निर्माण करून गेलो आईकडे आणि म्हणालो आईला कि आई उद्या शाळेत तुला बाईनी बोलवलय.आई म्हणाली कशाला ? नंतर आईला सर्व हकिकत सांगितली.आई म्हणाली ठीक आहे मी उद्या येईन.उद्याचा दिवस उजाडला,शाळेची वेळ झाली,आणि आई मला शाळेत घेऊन आली.शाळेत येताच बाईनी माझ्या आईकडे तक्रार केली. हा तुमचा समीर काल ह्या मुलीच्या शर्टावर थुंकला.मग माझ्याबरोबर आई असताना मी बाईनापण सर्व हकिकत सांगितली. तरी पण बाईना खरे वाटत नव्हते. नंतर मला वर्गात घेतले व सर्व शांत झाले.आई घरी गेली. मी माझ्या रोजच्या बाकावर बसलो,ती कुसकी मुलगी सुद्धा माझ्या पुढच्या बाकावर बसली होती,बाई पण शिकवत होत्या, जणू काही एक प्रकारचे ऊठलेले वादळ शांत झाले होते. बाहेर पाऊस पण पडत होता. आणि तोच पाऊस पडत असताना ती ज्या बाकावर बसली होती. त्याच बाकावर पत्र्यामधून खूप खूप वेळानी एकेक पावसाचा थेंब पडत असताना, त्यातला एक थेंब त्याच कुसक्या मुलीच्या तिच्या शाळेच्या शर्टावर पडला.आणि आताचा प्रकार तर मी स्वत: पाहिला होता. पण त्या मुलीला समजावणार कोण? तीने तर मागे माझ्याकडेच पाहिले. तीला पुन्हा वाटले कि मीच तीच्या शर्टावर थुंकलो .आता काय पुन्हा ती बाईंकडे गेली व बाईना सांगितले कि हा समीर पुन्हा आज पण माझ्यावर थुंकला.आणि काय बाईपण त्याच आपल्या मारकुट्या. बाई तर माझ्यावर चवताळून आल्या. तरी पण आज मी खरे बोललो कि बाई मी हिच्यावर थुंकलोच नाही, वरूनच पावसाचे पाणी तीच्यावर पडले.तरी बाई अजून रागावल्या.कारण त्याना वाटले कि मी खोट बोललो.मी पण मनातच ठरवले कि सांगून काहीही उपयोग नाही.त्याचाहून प्रसाद(प्रसाद म्हणजेच मार) खाल्लेला चांगला.
आणि काय सांगू! पहिल्यांदा मी थूकलो हे मला माहीत होते,पण पुढच्या दिवशी पाऊस पण थुंकेल ते पण त्याच कुसक्या मुलीवर हे मला माहीत नव्हते.त्या पावसाच्या एका थेंबामुळे माझी इतकी वाट लागेल हे तर मला माहीतच नव्हते.
बस्स मला पण तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे कि, पुढच्या दिवशी त्या कुसक्या मुलीवर थुंकला कोण?