रमलखूणा....

हसले होते मी

तुझ्या पहिल्या हाकेला....!

माझ्या नावाच्या प्रत्येक अक्षराच्या

नादातून हाकारणारी तुझी लाघवी ओढ

अन

ओसंडून जाणारी उत्कटता,

खुळावून गेली मला.

माझ्या आरस्पानी विश्वात

शोधत होतास तूझी प्रिया...

अन तेव्हाच सापडले मला,

परागंदा झालेले

माझे अनोळखी सूर.....

तूझ्या ओढाळ हाकेतून मग

झंकारत गेली एक सूप्त धून

लोपावत गेलेल्या विस्मृतीच्या तारांतून....!

ओळखले मी तूला

माझा कृष्णसखा तू......

ही ओढ युगांतराची की

"साद" गतजन्मीची.....?

अशीच अनाहत

बासरीच्या मंजूळ भाव-विश्वातून

जागी होतेय मी

न ऐकतेय "हाक" तूझी जीवाभावाची,

सखी मी तूझी रे

सखी मी तूझी.........!

शीला.