कवी : अनामिक
....................................
तो ............. दुचाकीस्वार
ती .............. पोलीस यंत्रणा
सक्ती जरा जास्तच आहे, यावर्षीच वाटतं
हेल्मेट म्हटलं की, ओझं मनात दाटतं
तरीही चाकं चालत राहतात, मन चालत नाही,
हेल्मेटशिवाय रस्तांवर कुणीच बोलत नाही.
कुठूनतरी अचानक १ दादा दिसतो,
पाकिटामधला काही भाग खिशामध्ये दडपतो.
दादा जीव तोडून सैरावैरा धावत राहतो
दूचाकीस्वार गल्लीबोळात घुसून पाहतो,
दुपार टळून संध्याकाळपर्यतं सुरू असतो हाच खेळ
रात्र झाल्यावर चालून येते सुरक्षित वेळ
त्याल हेल्मेट आवडत नाही,
तिला हेल्मेट आवडतं,
तिनं हेल्मेटची सक्ती करताच, त्याचं डोकं जाम भडकतं
दुसऱ्यांना टोप्या घालण्यापेक्षा हेल्मेट का घालत नाहीस ?
तिचे असले प्रश्न त्याला खरंच कळत नाहीत.
हेल्मेट म्हणजे गुंतलेले हात
हेल्मेट म्हणजे सांभाळण्याचा त्रास
हेल्मेट म्हणजे वजन अर्धा किलो
हेल्मेट म्हणजे सक्ती उगाच.......
दरवेळी फ़िरायला गेल्यावर दोघंच असं होतं
दंडावरुन भांडण होऊन, रस्त्यावर हसं होतं.
हेल्मेट आवडत नसलं तरी
बाईक त्याल आवडते
हेल्मेटसकट आवडावी म्हणून तीही झगडते,
चीडून मग ती दंड करते, उभं करते पुतळ्यासारखं
त्याचं तिचं भांडन असं होतं राहतं सारखं सारखं..........