आज गुत्यात बबन ढोसतो भारी,
मार खाणार आहे तो आज जाऊनी घरी!
तो मुजोर, चकणाचोर बाटली खोलतो
"आजच घेतोय" असे वरून खोटे बोलतो
दंग होऊन, टुन्न होऊनी बरळू लागतो
सांगतो तुम्हाला मी हो गोष्ट ही खरी
मार खाणार आहे तो आज जाऊनी घरी!!
अहो बबन्यास आज काय जाहले???
भर दिवसात त्याने तारे पाहिले!!
जिथे जिथे, नको तिथे, लोटांगण घातले
बायको लाटणे घेऊन त्याला आज मारी
मार खाणार आहे तो आज जाऊनी घरी!!
आज गुत्यात बबन ढोसतो भारी,
मार खाणार आहे तो आज जाऊनी घरी!