नमस्कार मंडळी,
शहरात जाणवणार नाही ("बुफे" या नव्या प्रचलनामुळे!). पण गावाकडच्या लग्नात पहिली पंगत मिळवण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो आणि पंगतीत बसलेले कधिही लवकर बाहेर येत नाहीत. सहजंच या विषयावर काही लिहावंसं वाटलं म्हणून ही कविता जन्माला आली. बघा आवडते का तुम्हा साऱ्यांना.
अरे पहिल्या पंगतीत बसणाऱ्यांनो आता तरी आटोपतं घ्या!!
जिलेबीच्या पराती च्या पराती तुम्ही संपवत आहात मस्त मजेत...
आणि आम्ही मात्र उगीचच तो रुखवत पुन्हा पुन्हा पाहत आहोत,
भाताच्या राशी पटापट रित्या होत आहेत तुमच्या त्या ताटांमध्ये...
आणि आम्ही मात्र पोटातल्या उंदरांचा धुमाकूळ अनुभवत आहोत!
अरे अरे ते पाणी नाही तो मठ्ठा आहे, जरा बेताने कमी कमी प्या...
अरे पहिल्या पंगतीत बसणाऱ्यांनो आता तरी आटोपतं घ्या!!
धक्काबुक्की करून तुम्ही पटकन भोजनकक्षामध्ये मुसंडी मारली...
आणि आम्ही मात्र उगीचच रांगेमध्ये शिस्तीत उभे राहिलो होतो,
नंतर कळलं की गावच्या पंगतीमध्ये हे असंच रांगडेपण चालतं...
आणि हे कळेपर्यंत आम्ही मात्र आमचा चान्स घालवून बसलो होतो!
ही घटना आता इतिहासजमा आहे पण दुसऱ्या पंगतीला चान्स द्या...
अरे पहिल्या पंगतीत बसणाऱ्यांनो आता तरी आटोपतं घ्या!!
"आऊऊऊप्प्फ्ह" असा ढेकर देऊन तिथून जरी उठलात तुम्ही...
तरी आईस्कीम व कोल्ड्रिंकवर तुफान हल्ला चढवणारचं असाल,
आणि तुमच्या गप्पीदास टोळक्यासोबत हॉलमध्ये ऐटीत जमून...
जेवणाची तारीफ करीत २-३ मसाला पाने ही चघळत बसाल!
अहो पण या साऱ्याचा फडशा पाडण्यासाठी तरी आता बाहेर या...
अरे पहिल्या पंगतीत बसणाऱ्यांनो आता तरी आटोपतं घ्या!!
अरे पहिल्या पंगतीत बसणाऱ्यांनो आता तरी आटोपतं घ्या!! आता तरी आटोपतं घ्या!!