झोळी

सौख्याच्या सागरात
रत्न हिरे मोती
तरी----
       झोळी माझी रिती

सुवर्णाच्या जलाशयी
आली आज भरती
तरी----
       झोळी तुझी रिती

झोळी रिती म्हणताना
नाकारले किती
---आले काय हाती

भाळावर नसलेली
जोडू कशी नाती
-----क्षणांची सांगाती!