...दि वा ळी !

........................................................................................................

`मनोगत`चे संचालक, प्रशासक, कायमस्वरूपी सदस्य, धावती भेट देणारे
पाहुणे-सदस्य....सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!
.........................................................................................................

...दि वा ळी !

..........................................

अंधारावर विजय...दिवाळी !

नवतेजाचा प्रलय...दिवाळी !

प्रसन्नतेचा उदय...दिवाळी  !

मांगल्याचे वलय...दिवाळी !

दुःख-व्यथांचा विलय...दिवाळी !

आनंदाचा समय...दिवाळी !

हवाहवासा विषय...दिवाळी !

दोन दिव्यांचा प्रणय...दिवाळी !

सर्व सणांचे ह्रदय...दिवाळी !

- प्रदीप कुलकर्णी

(प्रलय हा शब्द विपुलता, असीमता, पराकाष्ठा, निरतिशयता याही अर्थांनी वापरला जातो...! )

..........................................
रचनाकाल ः २२ व २३ ऑक्टोबर २००३
..........................................