रागावल्या सखीला.....

आमची प्रेरणा शरद रेशमेय यांची गझल  रागावल्या सखीशी.....

रागावल्या सखीला मज टाळता न आले
घडले पुढे कुणाला मज सांगता न आले

लाथेमुळे तिच्या हा पांगुळलो असा मी
चालायचेच सोडा मज रांगता न आले

आक्रंदनास ही ना संधी मला मिळाली
पडले मला किती ते मज मोजता न आले

हा भार मम  प्रियेचा मज पेललाच नाही
पडलो पुन्हा उभे ही मज राहता न आले

लिहितो विडंबने मी पण लायकी न माझी
मी थांबतो म्हणालो मज थांबता न आले