...पण आधी माझ्यातून

भ्रष्टाचार आठवतोच
चहापाण्याचे देताना
कसा बरं विसरतो
सहावी सीट घेताना

सिगरेटीचा पॅक
मुलाला सांगताना
ऑफिसरचा जॅक
नोकरी मागताना

कसा बरं विसरतो
रस्त्यावर थुंकताना
पहाऱ्याविना चौकात
सिग्नल 'जंप'ताना

भ्रष्टाचार होतोच
डॅडच्यातली चोरताना
भिडूच्या शीटसवरून
थेट 'जीटी' मारताना

कसा जाईल राजा
भ्रष्टाचार राज्यातून
करप्शन हटावंच
..पण आधी माझ्यातून