नवकवी साहित्य संमेलनावेळी सभासद होण्याकरीता दिलेली कविता.
‘अनंत’ गोष्टी सर्वत्र
आणि ‘एकटा’ मी
मी चालत चालत चाललोय
नी विश्व सभोवताली
केंद्रबिंदू मी, “माझ्यासाठी”
चक्रव्युहात शिरला अभिमन्यू जसा-
त्याच्यासारखंच मी लढतो आहे
एकाचवेळी अनेकांशी
(त्याच्यासारखंच मी जन्मजात शिकलो होतो
ह्या जीवनयुद्धाच्या चक्रव्युहात शिरणं
पण जाणत नव्हतो तिथून लढून मृत्यूशिवाय परतणं)
चालला आहे वेळ
मी आणि विश्वही
पण हे सर्व काय आहे ?
मी कसे समजू ?
मग वाटतं-
पाहण्यापेक्षा या ‘संपूर्ण विश्वास’
पाहिलेलंच बरं ‘माझ्या स्वतःत’
कारण तिथे आहे ‘एकच गोष्ट’
‘माझा आंतरात्मा’,
‘केंद्र्ही तोच’ आणि ‘विश्वही’
शोधण्यापेक्षा जागा या विश्वात
ती शोधलेली बरी माझ्या स्वतःत
त्यातच आहे आनंद समाधानाचा
की 'काहीच नाही', 'सर्व असतानाही'
रोहन जगताप
(दोन वर्षांपूर्वी बारावीत असताना लिहिलेली कविता)