झाली असतील लिहून

हे महर्षी!
झाली असतील लिहून तुमची
महाकाव्ये
तर माझ्या काळजातला बाण
काढाल का जरा..
आणि
आणखी एक विनंती
निदान तुमच्या त्या महाकाव्याचा अंत तरी
सुखान्त असू दे
माझ्या कहाणीसारखा नको!

आपला
क्रौंच