माझे म्हणजे असे झालय-

माझे म्हणजे असे झालय-
कुणालाही फोन करताना नम्बर तुझाच डायल होतो,
माझा म्हणुन तुझाच नम्बर सान्गितला जातो.
मेसेज आला तर वाट्ते कि तुझाच असावा,
बाहेर जाताना वाटते कि अचानक तु भेटावास.
नवीन ड्रेस घातला कि वाटते तु पहावस,
आणि साडी घातली कि वाटते तु छळावस.
वाटते तु आणि मी खूप दूर फ़िरायला जावे,
हातात हात गुम्फ़ुन रानोमाळ भटकावे.
तु माझे आणि मी तुझे सारे सारे ऐकावे,
वेळेचे भान तेव्हा दोघान्सहि न उरावे.
काय हे मनातले विचार कळेनासच झालय,
आणि माझ म्हणजे आजकाल असेच काहिसे झालय.

मृणाल