सैलावल्या बाहुपाशी
अजुनही आसपास
श्वासाश्वासात दरवळतोय
तुझाच गंध
मंद मंद
शीतलसा
चिंब वाळ्याच्या गवताचा ओलसर स्पर्श....
उबदार मिठीत झुलतोय झूला
चंदनगात्री,
मिटल्या पापण्यांत फुलताहेत तुझी
अलवार स्वप्ने.....
सरली नाही अजूनही
रातराणी चांदणवेळ,
श्वास तुझे ओथंबलेयत दवभरल्या ओठांवर
अधिरसे अजुनही
कालचीच लय टिपता टिपता.......
पूरे ना,राहू देत थोडी फुले उशाशी,
आवरू देत ना पहाटवाऱ्यास,
फुलारलेला स्वप्नपिसारा............!!!!!
शीला.