तसं काहिच नाही
तसं कोणिच नाही
मग ही चाहुल कोणाची
रिकाम्या घरात, विधवा भिंतिंवर
उमटतायत चित्र कोणाची
कोणाच्या पावलांनी आणला परत
लाटांचा आवाज माझ्या घरात
कोणाचा वावर सोडून गेला
ही वाऱ्याची सळसळ माझ्या उरात
कोणी उघडली ही खिडकी
आता खुपच जास्ती दिसतय मला
आकाश, इंद्रधनुश्य, वारा
सगळं कसं परत भावतंय मला
उघडू नका दार, मला परत दिसेल ती पायरी
दाराला ठोकल्यावर जिनं बंद केलं सगळं या गाभारी
तू काय शोधत्येस माझ्यात
डोळ्यामधले अश्रू वाहून गेल्येत
उरातली प्रेमं ओरबाडून झाल्येत
आता आत काही उरलं नाही
बाहेरून मी दिसतो... बस्स इतकंच
करू नकोस परत तिच चुक
तु सुद्धा
माझ्यामध्ये तुला माझ्याशिवाय
मिळणार नाही मिसुद्धा
शोधू नकोस माझ्यात
कवी आनिल, ग्रेस
पिकासो, मायकेल अँजेलो
कर्ण अर्जुन भिम
रोमिओ आणि जेम्स बाँड
हेच सगळं देता देता
दाराला ठोकली गेली ही पायरी
आणि मिळाला मुलाम्यादाखल थोडा शेंदुर