संधिकाल

जलौघी वाहती दीप

भिजके झाकोळले आकाश

स्मृतींची समई समीप

खिन्न हासतो प्रकाश ॥

या पिवळ्या प्रकाशाला

तू तुझी सय दे

या छिन्न सुरांना

संथ अशी लय दे ॥

दीप उजळो झर्‍याकाठी

राक्षस लागे भित्यापाठी

जीव फुटे उरीपोटी

विकट हसे धनाची पेटी ॥

संधिकालच्या या टाहोला

मायेचे एक गाव दे

सदा चिरंतन टिकुनि राहिल

असा खोलवर घाव दे ॥