सगळी कडे हिरवं गार
तकाकणारी पाती
लवलवत्या कोंबांची
कोवळीशी नाती
पुन्हा एकदा हसऱ्या उन्हाचा घोट मला प्यायचाय
माझ्या पावसाळी मातीतला एक श्वास मला घ्यायचाय
तळव्यावर पसरलेली
हिरवीगार नक्षी
डोळ्यांमध्ये लपलेले
हसरे चिमणे पक्षी
पुन्हा एकदा जुईचा सुगंध मला ल्यायचाय
माझ्या पावसाळी मातीतला एक श्वास मला घ्यायचाय