वाढ

आमची प्रेरणा अजब यांची कविता ओढ

देह आमचा बोजड दिसतो अजूनही
जीम बदलली, मेस बदलली असूनही...

मनात येता; चौपाटीवर फिरून मी
गुरासारखे उदरी घेतो भरून मी...

खाताना पण असतो मी प्रसन्न किती!
बघणाऱ्याला वाटत असते सुन्न किती!...

इतरांना मी दिसतो जबरी फुगलेला
माझ्या 'उदरी' मी असतो 'व्याकुळलेला'...