मला एकदा माझ्यासाठी जगायचंय
माझ्या आनंदासाठी मला हसायचंय
समोर फक्त रस्ता दिसेल
मी मनसोक्त त्यावर फिरत असेल
मनावर कसलेही दडपण नसेल
त्या मरुद्यानात माझेच पाऊल उठेल
डोंगर दर्यात भटकताना
हिरव्यागार पाऊलवाटेतून फिरताना
धबधब्यांतून भिजताना
पाहायचंय मला पावसात एकटाच आनंद लुटताना
गाडीला किक मारून
धुक्यातला रोड धरून
सोनेरी किरणांना अनुसरून
घ्यायचंय मला त्या सूर्याला स्मरून
फ़ोन स्विच ऑफ़ ठेवायचाय
माझ्यातच मला विसरायचंय
सुंदर निसर्गात रमायचंय
त्याच्यातलं गूढ रहस्य जाणायचंय
माझ्यातलं अस्तित्व मी हरवलोय
वेगळ्याचं जगात फसलोय
जगापासून दूर जायचंय
फक्त मी अन मलाच जगायचंय