आमच यान एकदा चन्द्रावर गेल होत...
चन्द्रावर जाउन तिथली पाखर पहात होत...
एकाच रस्त्यावर चालुन चौपदरी रस्ते दिसत होते...
आणि अडथळ्याना धडकल्यावरच 'ब्रेक' मारत होत
वरून रामाला वाकोल्या दाखवात होत
'बघ मी आलो चन्द्रावर'
असे म्हणुन त्यालाच पाण्यात पहायला लावत होत
आणि पृथ्वी वरच्या सुद्धा पोरी पहातील इतक्या शिट्ट्या मारत होत
रस्ता कुठ्ला...घर कुठल...त्याला माहित नव्हत
खर म्हणजे त्यातला फरकच ते ओळखत नव्हत
तेव्हड्यात दुरून कुठून तरी आवाज आला
'चला आता घरी...खुप ऊशीर झाला'
क्शणात समोरच्या अप्सरा अद्रुश्य झाल्या
वज्र लपवुन मागे, इन्द्रही पळाला
महामायेच ते रुप पाहील...
आणि आमच यान थाडकन जमिनीवर आलं