पावले

पावले

चालता चालता पावले
मध्येच थांबतात;
दमतात,
थकतात,
कि कानोसा घेतात.

आपल्याच मनोबलाचा!

चालता चालता पावले
मध्येच अडखळतात;
पुढे जातात,
मागे फिरतात,
कि चाचपतात.

आपल्याच विश्वासाला!

चालता चालता पावले
मधेच थकतात;
शिणतात,
कंटाळतात,
कि विचार करतात.

ती चालता आहेत,
थांबली आहेत,
कि चालवली जात आहेत याचा!

चालता चालता पावले
चाचपतात,
विचार करतात,
कि पडताळून पहातात.

ध्येय आहे म्हणून
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून
ध्येय आहे?

चालता चालता पावले
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात!

स्वाती फडणीस................1995